ऊसगल्लीतील एका दुकानाला अचानक आग

0

धुळे। शहरातील उसगल्लीतील एका दुकानाला अचानक आग लागून दीड लाखाचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. रविंद्र दामोदर गिंदोडीया (मुन्नाभाई मिठवाले) यांचे पाचकंदील परिसरातील गल्ली नं. 3 व 4 च्या बोळीत डिस्पोजल साहित्याचे दुकान आहे. या दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागली. रविंद्र गिंदोडीया हे या दुकानाच्या समोर रहात असतांनाही त्यांना या आगीचा सुगावा लागला नाही. परंतू दुकानाच्या समोरच मारोतीचे मंदिर असल्याने तेथील भाविकांना पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास या दुकानातून धूर लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आजूबाजूच्या लोकांना आरोळ्या देवून जागे केले. त्यावेळी घर मालकाच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी तात्काळ एमएसईबी कार्यालयाशी व मनपाच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला.

तीन बंब घटनास्थळी आल्याने आग आटोक्यात
यावेळी अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर आज सकाळी 6 वाजेला ही आग आटोक्यात आणण्यात आली. हे दुकान दुमजली असल्याने घराचे लाकडे जळून खाक झाली. तसेच या दुकानातील डिस्पोजल साहित्याची विक्री केली जात होती. त्यात पत्रावळ्या, ग्लासेस, गुलाल आदी साहित्य जळाल्याने त्यात दीड लाखाचे नुकसान झाल्याचे या दुकानाचे मालक रविंद्र गिंदोडीया यांनी सांगितले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, एमएसईबीचे कर्मचारी उशिरा घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आणण्यासाठी उशिर झाला, म्हणून अधिक नुकसान झाले. दरम्यान या घटनेचा पंचनामा होवून आझादनगर पोलिसांत अग्निउपद्रवची नोंद करण्यात आली आहे.