ऊसाचे उत्पादन वाढीसाठी आधुनिक कमी खर्चाचे तंत्रज्ञान अवलंबवावे

0

म्हसावद । सातपुडा तापी परिसर ससाका लि. पुरुषोत्तमनगर यांचेतर्फे आयोजित सातपुडा मिशन – 20 या कार्यक्रमाअंतर्गत चिखली दि. येथील चंद्रसिंग नाईक यांच्या ऊस क्षेत्रावर ‘व्हीएसआय 12121 (8005)’ नवीन वाणाचा बेणेमळ्यातील ऊसाचा पाहणी कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील हे होते. कृषी तज्ञ रामेश्‍वर चांडत यांनी ऊस उत्पादक सभासदांना मार्गदर्शन करतांना ऊस उत्पादन वाढ करावयाची असेल तर यापुढे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकरी सभासदांनी केला पाहिजे, असे प्रतिपादन केले.

शेवटच्या गाळपापर्यंत कारखाना सुरूच
गेल्या हंगामामध्ये साखरेचे दर कमी झाले असले तरी दिपक पाटील, चेअरमन व संचालक मंडळाने जाहीर केलेल्या दराप्रमाणेच शेतकर्‍याचे पेमेंट अदा करीत आहोत. तसेच मागील हंगामात साखरेचे दर कमी झाल्याने कार्यक्षेत्रातील सर्व कारखाने, खांडसरी लवकर बंद झाले. तरी आपल्या कारखान्याला आर्थिकदृष्ट्या न परवडणारे असतांनाही सभासदांचा हितासाठी सभासदांचा शेवटचा ऊस गाळप होईपर्यंत कारखाना चालू ठेवण्यात आला असे ते म्हणाले.कार्यक्रमास कारखान्याचे संचालक शशिकांत गोविंद पाटील, विठ्ठल पाटील माजी संचालक, सुभाष देविदास पाटील, गोपाळ शंकर पाटील, डॉ. गणेश पाटील, गिरधरभाई, सुदाम कुंवर, सरवरसिंग पटले, पाडवी साहेब, कारखान्याचे गट कर्मचारी गोकुळ बोरसे, विलास पाटील व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी गणेश चव्हाण यांनी केले व मुख्य शेतकरी अधिकारी अजितकुमार सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

किडींचा प्रादुर्भाव रोखावा
सध्याची ऊसाची परिस्थिती लक्षात घेता, पिक संरक्षण उपाययोजनांमध्ये जैवीक किटकनाशकांचा वापर सर्वच ठिकाणी दाखला पाहिजे. सध्या ऊसामध्ये खोड किड, कांडी किड, शेंड अळी, हुमणी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असून, यासाठी ट्रायकोकार्ड, विविध सापळे, मेटारायझीम याचा वापर वाढविण्यावर जोर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुरेश नाईक यांनी केले. कारखान्यामार्फत म्हसावद, मोड, फेस या गावामधील आडसाली ऊस लागवड व खोडवा व्यवस्थापन या विषयावर कार्यक्रम घेण्यात आले.

हंगामनिहाय नियोजन
यावेळी कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी ऊस लागवडीचे 2018 -19 चे नियोजन प्रत्येक सभासद शेतकर्‍यांना देण्यात आलेले आहे. त्याप्रमाणे या हंगामात आडसाली ऊसाची लागवड दि. 15 जुलैपासून करावी असे सांगितले. ‘व्हीएसआय 12121 (8005)’ या नवीन वाणाचे ऊस बेणेमळा कार्यक्षेत्रात कारखान्यामार्फत जोपासना केलेली आहे. आडसाली, पूर्व हंगामी, सुरु तिन्ही हंगामात लागवडीस योग्य व खोडवा पिक चांगले येत असल्याने जास्तीत जास्त या वाणाची ऊस लागवड करावी. तसेच या हंगामासाठी नोंद केलेल्या ऊसाच्या गाववार याद्या प्रत्येक गावातील सोसायटी / ग्रामपंचायत कार्यालयात पाहण्यासाठी लावलेल्या आहेत. त्यात काही तक्रारी असल्यास दि. 30 जूनपर्यंत जवळच्या गटकार्यालय/ केंद्र कार्यालयात आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे सांगितले.