शहादा । परिसरातील सर्व ऊस उत्पादक सभासदांचा ऊस संपुर्ण गाळप झाल्याशिवाय सातपुडा थांबणार नाही, असे निवेदन सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी केले आहे. गळीत हंगामाच्या सुरुवातीला ऊस तोडणी मजुरांअभावी 2000 ते 2200 में.टनापर्यंत गाळप होत होते. मात्र आज 3350 में.टन ऊस गाळप झाले असुन यापुढे दैंनदिन 3800 में.टनापर्यंत गाळप होईल, अशी ऊस तोडणी यंत्रणा उभी झाली आहे. आज अखेर 73 हजार 890 में.टन ऊसाचे गाळप झालेले असुन काही ऊस उत्पादक शेतकरी खाजगी तोड करुन सहकार्य करित आहे. सर्वांच्या सहकार्यने आता पुर्ण क्षमतेने सातपुडा चालणार आहे. सर्वांच्या मदतीने आणि सहकार्याने कारखाना पुर्ण क्षमतेने चालेल असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
ऊस गाळपासाठी ऊस कारखान्यास देण्याचे आवाहन
राज्यात एकुण 7 विभागात 83 सहकारी साखर कारखाने व 60 खाजगी साखर कारखाने असुन असे एकुण महाराष्ट्रात 143 साखर कारखाने सुरु आहेत.आज अखेर 149.89 लाख में.टन ऊसाचे गाळप झाले असुन 148.21 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झालेले आहे.कोल्हापुर,पुणे,अहमदनगर यां पश्चिम महाराष्ट्राच्या उच्च उतार्याचा परिसरात सरसरी 9.82 ते 10.80 साखर उतारा मिळत असुन औरंगाबाद, नांदेड, अमरावती आणि नागपुर या विभागात सरासरी 7.85 ते 9.65 साखर उतारा येत आहे. तसेच साखरेचा बाजारभाव हा स्थीर नसुन सद्या घसरण सुरु आहे. अशा परिस्थितीत कारखान्याना अडचणीना तोंड दयावे लागत आहे.सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांना आवाहान करणेत येते की, सर्वांनी आपला ऊस गाळपासाठी सातपुडा कारखान्यासच दयावा. असे आवाहन सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांनी केले आहे.
सभासदांकडून योग्य प्रतिसाद
मागील वर्षी परिसराबाहेरील कारखान्यानी जादा पैश्यांचे अमिष दाखवुन आपल्या सभासदांचा ऊस नेला होता व काही शेतकर्यांना अजुनही त्याची रक्कम मिळाली नाही. परंतु ज्या शेतकर्यांनी बाहेरील कारखान्यास ऊस दिला होता त्यांनी विंनती अर्ज दिल्याने त्यांचा ऊस देखील गाळप करण्याचा स्तुत्य निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. तसेच नोंद व बिगर नोंद असणार्या सर्व सभासदांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने समाधान व्यक्त होत असल्याची माहिती चेअरमन दिपक पाटील यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.