शहादा । सातपुडा कारखान्याबाबत ऊस उत्पादक शेतकर्यांच्या मनात गैरसमज व दिशाभुल करणार्यांना शेतकरी बांधावानी वेळीच आवर घातली पाहीजे अन्यथा पुष्पदंतेश्वर कारखाना कवडीमोल भावात विकला गेला तसा मनसुभा ठेवणार्यांनी केवीलवाणा प्रयत्न वेळीच हाणुन पाडावा असे आवाहान सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी केले होते. 4 नोव्हेबर रोजी सातपुडा कारखान्यांचा गळीत शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्ह्यांचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करणेत येवुन दरवर्षाप्रमाणे सर्वप्रथम सर्वाधिक ऊसदर जाहिर केला जातो. त्याचप्रमाणे यावर्षीदेखील व्यासपीठावरुन शेतकर्यांना एफ.आर.पी. रक्कमेपेक्षा रु.200/- जादाभाव धरुन रु.2200/- एकरक्कमी भाव जाहिर केला होता. आज शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 2400 रूपये प्रती मे. टन भाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सभासदांना आर्थिक मदत
कारखान्याची आर्थिकस्थिती सर्व सभासद शेतकर्यांना ज्ञात असून सभासदांच्या मागणीनुसार गुजरात पॅटर्नप्रमाणे 3 हप्ताने, जाहिर केलेल्या दरापेक्षा प्रति में.टन रु.200/- जास्त ऊसदर मागील वर्षाप्रमाणे देणेत येईल. तसेच साखरेचेे दर स्थिर राहिल्यास व अपेक्षेनुसार 450000 में. टन गळीत झाल्यास यानंतरही सभासदांच्या हिताचा निर्णय संचालक मंडळ घेणेस सदैव तयार आहे असे चेअरमन दीपक पाटील यांनी सांगितले होते. तसेच सातपुडा कारखाना सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे व खर्या अर्थाने सभासदांनी या कारखान्यास आर्थिक मदत देवुन कारखान्यास ऊस पुरवठा करुन व कारखान्याचे सातपुडा मिशन 100 अभियानात भाग घेवुन कारखाना जिवंत ठेवत आहे.
शेतकर्याच्या उत्पन्नात वाढ
सातपुडा साखर कारखान्याने एकरी 100 में.टन उत्पादन मिळाले पाहीजे कमी साखर उतारा झोनमध्ये दर एकरी उत्पादन वाढुन शेतकर्यास दर एकरी जास्तीत जास्त नफा मिळावा त्यामुळे दर एकरी 24 ते 25 में.टनावरुन 36 में.टन प्रति एकरी सरासरी उत्पादन वाढल्यामुळे शेतकर्यास उत्पन्नात वाढ झाली आहे. दरम्यान शनिवारी झालेल्या बैठकीत तसेच पहिली उचल 2100 रूपये, दुसरी उचल जुन अखेर 100 रूपये व तिसरी उचल दिपवाळीस 200 रूपये प्रती मे. टन जाहीर केले आहे. तरी सर्व ऊस उत्पादक सभासदांनी याची नोंद घेऊन सातपुडा कारखान्यासच ऊस पुरवठा करावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी केले आहे.
तीन टप्प्यात वाटप
ऊस दराबाबत शनिवार 11 नोव्हेंबर रोजी चेअरमन दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत संचालक मंडळाच्या सभेत ठरल्यानुसार 2400 रूपये में. टन उसाचा दर तीन हप्त्यात देण्याचा ठराव संमत करण्यात आला. एकरकमी 2200 रूपये प्रती में. टन दराचा निर्णय आजच्या सभेत स्थगीत करण्यात आला असून आज संचालक मंडळाच्या सभेतील चर्चेनुसार प्रती मे. टन 2400 रूपयांप्रमाणे भाव देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.