ऊसाला 3,100 रुपयांचा दर

0

बारामती । बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांना प्रतिटन 3100 रुपये दर जाहीर केला आहे. गेटकेनसाठी 2900 रुपये तर खोडवा असलेल्या ऊस उत्पादक सभासदांना प्रतिटन 150 रुपये अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, जेष्ठ संचालक चंदरआप्पा तावरे व अविनरश देवकाते यांनी दिली आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत ऊसाच्या दराची चर्चा होऊन अंतिम दर जाहीर करण्यात आला.

जिल्ह्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना असा माळेगाव कारखान्याचा लौकीक आहे. राज्यातील जे सर्वाधिक दर देणारे पहीले पाच साखर कारखाने आहेत. यात माळेगाव साखर कारखान्याचा समावेश होतो. माळेगाव साखर काखान्याची सर्वसाधारण सभा 29 सप्टेंबरला होणार आहे. या सभेत कारखान्याच्या विस्तारीकरणावर भर देण्यात येणार असून कारखान्याचे आधुनिकीकरणाचे महत्त्व, त्याचा फायदा, कचरा प्रकल्प याविषयी सभासदांना सविस्तर माहिती देण्यात येईल, असेही अध्यक्ष तावरे यांनी सांगितले.