विविध पक्षांनी दिला पाठिंबा ; रंधे परिवार राजकारण करत नसल्याचा निर्वाळा
सत्ताधार्यांनी कारखाना सुरू करण्याचे आश्वासन पाळण्याची मागणी
शिरपूर । तालुक्याच्या आर्थिक विकासाचा स्त्रोत असलेल्या शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासंदर्भात प्रयत्न व्हावेत, या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकर्यांसह शेतकरी विकास फाऊंडेशनने आज लाक्षणिक उपोषण केले आहे. शिसाका निवडणुकीत रंधे परिवाराला केंद्रबिंदू मानून राजकारण केले गेले. मात्र रंधे परिवार हे कधीही राजकारण करीत नाहीत. कारखाना सुरु व्हावी अशी माफक अपेक्षा ऊस उत्पादक शेतकरी म्हणून आहे. निवडणूक काळात कारखाना सुरु करण्याचे आश्वासन सत्ताधार्यांनी दिले होते. ते पाळावे, जनतेचा उद्रेक देखील होऊ शकतो अशा प्रखर शब्दात किविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे यांनी उपोषणाची सांगता होत असतांना केलेल्या मनोगतात व्यक्त केले.
सकाळी 10 वाजता उपोषणास सुरूवात
सोमवार 12 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत येथील तहसिल कार्यालयाच्या रस्त्यावर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, प्रहार जनशक्तीपक्ष, किसान सभेसह विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. यावेळी माजी आ.संभाजीराव पाटील, किविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, डॉ.जितेंद्र ठाकूर, दिनेश मोरे, प्रशांत पाटील, हिंमत महाजन, राजू टेलर, भरतसिंग राजपूत, मनोज धनगर, अॅड.हिरालाल परदेशी, अॅड.शांताराम महाजन, किरण दलाल, डॉ.उत्तमराव महाजन, प्रा.पी.एस.अंतुर्लीकर, ठाणसिंग पाटील, अशोक श्रीराम, अॅड.गोपाल राजपूत, मोहन पाटील, संजय पाटील, चंद्रकांत पाटील, अॅड.अमित जैन, मिलींद पाटील, उज्ज्वलसिंग सिसोदिया, तेजस गोटे, दिलीप लोहार, वसंत पावरा, निलेश महाजन, चंदनसिंग राजपूत, राजुअण्णा गिरासे, ईश्वर बोरसे, विनायक देवरे, डॉ.सरोज पाटील, भाईदास पाटील, दीपक जमादार, नरेंद्र राजपूत, रोहित रंधे, निशांत रंधे, शशांक रंधे, रणजितसिंग रावल, कोमलसिंग राजपूत, इंद्रसिंग राजपूत, रमेश वसावे, हिंमत महाजन, अरुण धोबी, रामकृष्ण पाटील आदी उपस्थित होते.
उपोषणकर्त्यांनी केला प्रशासनाचा निषेध
सायंकाळी 5 वाजता उपोषण संपण्याच्या मार्गावर असतांना निवेदन घेण्यासाठी नायब तहसिलदार गणेश सुर्यवंशी हे आलेत परंतू तहसिलदारांनी निवेदन घ्यावे अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली. त्यावेळी उपोषणकर्ते अशोक श्रीराम यांनी महसुल विभाग फक्त वाळूचे हप्ते घेण्यात दंग असल्याचा आरोप करीत निषेध केला. यावेळी संतप्त उपोषणकर्त्यांनी तहसिलदार निवेदन घेण्यासाठी येणार नसतील तर रास्ता रोको, शिंगाड्या मोर्चा, तहसिलदार कार्यालय ताब्यात घेण्याची भूमिका मांडली. त्यामुळे काहीवेळ तेथे गोंधळ उडाला. शेवटी शिरपूर पोलिस ठाण्याचे पो.नि.संजय सानप यांच्यासह तुषार रंधे व राहुल रंधे यांनी जनतेला शांततेचे आवाहन केल्यानंतर उपोषण संपले.
यांनी व्यक्त केले मनोगत
तुषार रंधे म्हणाले, गेल्या निवडणूकीत सत्ताधार्यांनी साखर कारखाना सुरू करण्याचे आश्वासन दिले असतांना तब्बल दीड दोन वर्ष उलटूनही अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही. सत्ताधार्यांचा भरोशावर शेतकर्यांनी कारखाना ताब्यात दिला. त्यांनी तो चालू करावा हीच प्रांजळ इच्छा आहे. यावेळी अॅड. शांताराम महाजन, बबन चौधरी, हिंमत राजपूत, राजू टेलर, प्रशांत पाटील, उमाकांत पवार, अॅड. हिरालाल परदेशी, विनायक देवरे, राजेंद्र पाटील, मनोहर पाटील, प्रा. संजय पाटील, भरतसिंग राजपूत, शांतीलाल पाटील, हेमराज राजपूत, रणजित राजपूत आदींनी कारखाना संदर्भांत विचार मांडलेत.
https://youtu.be/IjaHtNSO2Uw