चिंबळी : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याने वाकड येथे झालेल्या 29 व्या वार्षिक सभेमध्ये खेड तालुक्यातील उस उत्पादक शेतकर्यांचा गौरव करण्यात आला. उस उत्पादक शेतकर्यांमध्ये वडगाव घेनंद येथील शेतकरी तुकाराम बवले, कोयाळी येथील रामदास शिंदे, चिंचोशी येथील शिवाजी मोरे, मरकळ येथील शैलेश लोखंडे, धानोरे येथील गोविंद गावडे यांचा उत्कृष्ठ उस उत्पादनाबबत श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी खासदार विदुरा नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी खासदार अशोक मोहोळ, संचालक अनिल लोखंडे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांची प्रतिमा व रोख 5,000 रूपये व 10,000 रुपये बक्षीस देवून सन्मान करण्यात आला.
हे देखील वाचा
या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची दुसरी शाखा उभरण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी कृष्णराव भेगडे, माजी आ.दिगंबर भेगडे, माजी आ.ज्ञानेश्वर लांडगे, रमेशचंद्र ढमाले, शंकरराव शेलार, माऊली दाभाडे, भाऊसाहेब भोईर यांच्यासह आजी-माजी संचालक व सभासद शेतकरी उपस्थित होते.