चिंचवड : येथे ऊसाची ट्रॉली घेऊन जाणारा ट्रॅक्टर अचानक उलटून त्यामध्ये सापडलेल्या पादचारी वृद्धेचा रुग्णालयात मृत्यू झाला. सोमवारी दुपारी झालेल्या या अपघातात सुमन कांबळे (वय 60, रा. आनंदनगर, चिंचवड) या जखमी झाल्या होत्या. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
कांबळे आपल्या नातीला शाळेतून आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्याचवेळी रस्त्यावरून निरामय हॉस्पिटलच्या दिशेने ऊसाचा टॅ्रक्टर जात होता. यावेळी ट्रॉली अचानक उलटून सगळा ऊस त्यांच्या अंगावर पडला. यामध्ये डाव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली, तसेच ओझ्यामुळे कानातूनही रक्त आले होते. यातच त्यांचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला.