ऊस लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन बंधनकारक

0

मुंबई : ऊस लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ठिबक सिंचन योजनेसाठी राज्य सरकार 25 टक्के अनुदान देणार आहे. या निर्णयामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली जाते. मात्र ऊसाला पाणी पाईप लाईनने अथवा थेट पाटाने दिले जाते. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. आणि जमिनीची धुपही होते. ठिबक सिंचनामुळे आवश्यकते नुसार ऊसाला पाणी मिळेल.

आधीची सबसिडी द्यावी
मंत्रीमंडळाच्या या निर्णयाला शेतकरी संघटना नेते राजू शेट्टी यांनी विरोध केला आहे. ठिबक सिंचन सक्तीची भाषा सरकारने करू नये. ठिबक सिंचन कंपन्यांचा फायदा करण्याचा सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारमधील काही मंत्र्यांशी कंपन्यांचे लागेबांधे आहेत. असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. सरकारचा हा निर्णय महम्मद तुघलकी आहे. सरकारने आधी मागेल त्याला ठिबक सिंचन द्यावेत. आणि आधीची राहिलेली ठिबकची सबसिडी द्यावी अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली आहे.