औरंगाबाद । एन्ड्युरन्स मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी) आयोजित 14 वर्षांखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या ऋतुजा चाफळकर, सुदिप्ता कुमार यांनी, तर मुलांच्या गटात छत्तीसगडच्या क्रिशन हुडा, आसामच्या उदित गोगईने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
एकेरीतील उपांत्य फेरीत मुलींच्या गटात पाचव्या मानांकित महाराष्ट्राच्या ऋतुजा चाफळकर हिने तेलंगणाच्या आदिती आरेचा 6-1, 6-1 असा पराभव अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसर्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अव्वल मानांकित महाराष्ट्राच्या सुदिप् ता कुमारने तेलंगणाच्या तिसर्या मानांकित संजना सिरीमल्लाचा 6-2, 6-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुहेरीत अंतिम फेरीच्या लढतीत ऋतुजा चाफळकर व नैशा श्रीवास्तव यांनी संजना सिरिमल्ला व क्रिस्ती बोरो या जोडीचा 6-4, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
मुलांच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित क्रिशन हुडाने हरयाणाच्या चौथ्या मानांकित अमन दहियाचा टायब्रेकमध्ये 6-2, 5-7, 7-6(1)असा पराभव केला. आसामच्या दुसर्या मानांकित उदित गोगईने महाराष्ट्राच्या दहाव्या मानांकित यशराज दळवीचा 4-6, 7-5, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात अमन दहिया व उदित गोगई यांनी यशराज दळवी व विशेष पटेल यांचा 6-4, 6-4, असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
मुले: अमन दहिया,उदित गोगई विजयी विरुद्ध किशन हुडा/अजय सिंग 6-2,6-7(4),10- 3. यशराज दळवी,विशेष पटेल(4) विजयी विरुद्ध कार्तिक सक्सेना,चिराग दुहान(2) 6-4,3-6,10-7.
मुली: ऋतुजा चाफळकर, नैशा श्रीवास्तव विजयी विरुद्ध रेनी सिंगला, रेनी सिंग 6-3, 6-4, संजना सिरिमल्ला, क्रिस्ती बोरो(3) विजयी विरुद्ध रिया भोसले, कशिश बोटे 6-2, 6-2.