ऋषभ-संजूची वादळी खेळी

0

नवी दिल्ली । दिल्ली डेअरडेव्हिल्सने ऋषभ पंत व संजू सॅमसन यांच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात लायन्सला 7 विकेट्सने लोळवले.

या पराभवाने गुजरातचे आव्हान जवळपास संपल्यात जमा झाले आहे. सॅमसनने 31 चेंडूंत 7 षटकारांचा नजराणा पेश करून 61 धावा कुटल्या. दुसरीकडे, पंतने 43 चेंडूंत 97 धावांची वादळी खेळी केली. गुजरातचा कर्णधार सुरेश रैना व दिनेश कार्तिक यांनी गुजरातला 20 षटकांत 7 बाद 208 धावांची मजबूत मजल मारून देत दिल्लीच्या हातून हा सामना हिसकावला. सॅमसन-पंतच्या जोरावर दिल्लीने 17.3 षटकांतच बाजी मारताना 3 बाद 214 धावा केल्या.