Married Woman In Chopda City Died Due To Drowning In Tapi Vessel जळगाव : चोपडा येथील विवाहितेचा ऋषीपंचमी निमित्त अंघोळीसाठी गेल्यानंतर तापी पात्रात बुडाल्याने मृत्यू झाला. विद्या प्रल्हाद पाटील (रा. पिंपळेसीम, ह.मु.चोपडा, जि.जळगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे.
तोल गेल्याने बुडून मृत्यू
विद्या पाटील ह्या पती प्रल्हाद गोपीचंद पाटील यांच्यासह चोपडा येथे वास्तव्याला आहे. गुरुवार, 1 सप्टेंबर रोजी ऋषीपंचमी असल्याने गल्लीतील महिलांसोबत विद्या पाटीलदेखील गेल्या होत्या. चोपडा-धरणगाव रस्त्यावरील तापीनदीजवळ दादाई मंदिराजवळ असलेल्या तापी नदीच्या पायर्यांजवळ उतरल्या. नदीच्या पाण्यात आंघोळ करतांना अचानक त्यांचा तोल गेल्याने त्या पाण्यात बुडाल्या. दरम्यान, त्यांचा मृतदेह तांदलवाडी गावाजवळील नदीच्या थळीवर आढळून आला. नातेवाईकांनी मयत महिलेची ओळख पटविली आहे. याबाबत रात्री उशीरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत महिलेच्या पश्चात सासरे गोपीचंद नथ्थू पाटील, पती प्रल्हाद पाटील, दीर, आई, वडील असा परीवार आहे.