ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांचा मजेदार किस्सा

0

मुंबई: काळ बदलतो त्याप्रमाणे चित्रीकरणाच्या पद्धतींपासून ते चित्रपटांच्या विषयांपर्यंत बऱ्याच गोष्टी बदलतात. या साऱ्यामध्ये एक गोष्ट तितकीच रंजक होत असते. ती गोष्ट म्हणजे जुन्या आठवणी. ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी अशाच एका आठवणीला उजाळा दिला.

 

सोशल मीडियावर झालेल्या संवादामध्ये खुद्द ऋषी कपूर यांनीच याविषयीचं गुपित उलगडत हा किस्सा सांगितला. मला आपल्यासोबतचा तो किस्सा आठवतोय. जेव्हा आपण दोघंही बुरखा घालून हैदराबादसाठीच्या प्रवासाला निघालो होतो. हैदराबादयेथील एका प्रवासादरम्यान, ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी बुरखा घालत प्रवास केला होता. लोकप्रियता आणि प्रेक्षकांची होणारी गर्दी पाहता त्यांनी अशा प्रकारे प्रवास करण्यास प्राधान्य दिलं होतं. मुख्य म्हणजे त्या काळात अनेक सेलिब्रिटी गर्दीच्या ठिकाणी वावरतेवेळी किंवा प्रवासादरम्यान बुरखा वापरत असत. पण, हा किस्सा खास ठरण्याचं कारण म्हणजे बुरखा पडल्यामुळे या कलाकार गुपित सर्वांसमोर उघड झालं होतं.