मुंबई । ऋषी कपूर आपल्या ट्विटर अकाऊंटवर नेहमीच अॅक्टिव असतात. टीका, चिमटे काढणारे ट्वीट करून ते नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. परंतु, यावेळी त्यांनी केलेले ट्वीट नुसता त्यांनाच नाहीतर दिग्गज बॉलिवूड सेलिब्रिटींनाही त्रासदायक ठरला. नेटिझन्सनी ऋषी कपूर यांच्या ट्वीटवरून ऋषी कपूर यांच्याबरोबर अभिनेत्री जुही चावला, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही त्यांच्या आयक्यूवरून ट्रोल केले. एरव्ही आयक्यूवरून आलिया भट्ट विनोदाचा भाग बनते. त्यांच्या ट्वीटला रिट्वीट करत जूही आणि बच्चनही त्यांच्या सामान्य ज्ञानवरून विनोदाचा भाग बनले.
जुही, अमिताभही अडकले
ऋषी कपूर यांना सामान्य गणिताचं कोड समजल नाही आणि त्यांनी ट्वीट केले. परंतु, त्यानंतर अभिनेत्री जुही चावला यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही ट्वीटला रिट्वीट केले. त्यानंतर नेटिझन्सनी या बॉलिवूडकरांना गणिताचे सामान्य ज्ञानही नसल्याचे सांगत ट्रोल करण्यास सुरूवात केली.
नेमके काय केले ट्वीट?
ऋषी कपूर यांच्या सामान्य ज्ञानवरून प्रश्न उपस्थित केले. ऋषी कपूर यांनी एक फोटो ट्वीट केला होता. यामध्ये एक कोडे होते. फोटोवर लिहिले होते की, जर तुम्ही तुमचा जन्म झालेल्या वर्षात सध्याचे वय जोडता तर, त्याचे उत्तर 2017 म्हणजे चालू वर्ष असेल. यावेळी, असे केवळ एक हजार वर्षात एकदाच होते, असा दावा केला. पण, गणिताचे सामान्य ज्ञान असणार्या सामान्य नागरिकांना ही साधी गोष्ट माहित आहे की, जर आपल्या जन्म झालेल्या वर्षात सध्याचे वय जोडले तर, उत्तर हे चालू वर्षचं येईल. आणि हे तुम्हीही कोणत्याही वर्षी केलं तरी त्याचं उत्तर त्यावर्षी चालू वर्षच मिळेलं.