नवी दिल्ली: दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने वोडाफोन आणि आयडीया कंपनीला फटकारले होते. दूरसंचार विभागाचे हजारो कोटींचा एजीआर महसूल वोडाफोन आणि आयडीया कंपनीने बुडवला आहे. सुप्रीम कोर्टाने महसूल भरण्याचे आदेश दिले असतानाही महसूल भरण्यात आलेला नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान एअरटेल भारती लिमिटेडने दूरसंचार विभागाला एजीआरच्या थकबाकीसाठी 10,000 कोटी रुपये भरले आहे.