एअरस्ट्राईकचा भाजपाला फायदा, एनडीएच्या 13 जागा वाढणार?

0

नवी दिल्ली – पुलवामा दहशतवादी हल्ल्यांनर भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईकमुळे भाजपाला मोठा फायदा होणार असून लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) 13 जागा वाढतील असा अंदाज टाइम्स नाऊ आणि वीएमआरच्या सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे. यापूर्वीच्या सर्वेक्षणात एनडीएला 270 जागाच मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, हा आकडा वाढून 283 होण्याची शक्यता आहे.

एअरस्ट्राईकनंतर उत्तर प्रदेशात सपा-बसपा आणि राजदच्या महाआघाडीला मोठा झटका बसू शकतो. तर दुसरीकडे एनडीएला उत्तर प्रदेश, आसाम, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये फायदा मिळत आहे. एनडीएला सर्वाधिक उत्तर प्रदेशात 3 जागांवर फायदा मिळू शकतो. हल्ल्यापूर्वीच्या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशात भाजपाला 39 जागा मिळणतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता आता हा आकडा आता 42 झाला आहे. काँग्रेस आघाडीच्या जागा घटण्याचा अंदाज यात वर्तविण्यात आला असून त्यांच्या जागांचा आकडा 135 राहिल असा अंदाज आहे. जो हवाई हल्ल्यापूर्वी 144 इतका राहिल असे भाकीत वर्तवण्यात येत होते