नवी दिल्ली । विस्तारा, स्पाईसजेट आणि इंडिगोनंतर आता एअर इंडियाने आपली मान्सून स्पेशल ऑफर जाहीर केली आहे. मान्सून स्पेशल ऑफरनुसार एअर इंडियाच्या तिकीटांचे दर 706 रूपयांपासून आहेत. या श्रावण स्पेशल सेल अंतर्गत तुम्हाला 17 जून ते 21 जून दरम्यान विमानाची तिकीट बूक करावी लागेल. ही ऑफर 1 जुलै ते 20 सप्टेंबर दरम्यान प्रवास करणार्यांसाठीच आहे. एअर इंडियाने त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर आणि वेबसाईटवर याची माहिती दिली आहे. मान्सून सेलच्या बाबतीत एअर इंडिया इतर कंपन्यांना जोरदार टक्कर देत आहे. या ऑफरचे तिकीट तुम्ही एअर इंडिया बुकींग ऑफिस, वेबसाईट, अॅप आणि अधिकृत ट्रॅव्हल एजंटकडून बुक करू शकता. ही ऑफर डोमेस्टिक नेटवर्कच्या काही मोजक्याच सेक्स्टरसाठी आहे.