मुंबई । एअर इंडियाच्या कर्मचार्यांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एक गर्भवती, तिचा पती आणि दोन प्रवाशांना एअर इंडियाच्या कर्मचार्यांनी विमानात चढण्यास मज्जाव केला. हे प्रवासी मुंबईहून नागपूरला जात होते. डोंबिवलीच्या मानपाडामध्ये राहणारे व्यावसायिक रजनीकांत चतुर्वेदी यांच्या माहितीनुसार, सोमवारी पत्नीसोबत मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी त्यांनी एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट खरेदी केले होते.
त्यांच्या तिकिटाचा नंबर 0985318448384 आणि त्यांच्या पत्नीच्या तिकिटाचा नंबर 0985318448383 असा आहे. ‘विमान पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी उड्डाण करणार होते. आम्ही 4 वाजून 55 मिनिटांनी विमानतळावर पोहोचलो. आम्ही बोर्डिंग पाससाठी संबंधित काऊंटरवर पोहोचलो, पण काऊंटर बंद असल्याचे कारण देत, आम्हाला विमानात चढण्यास मज्जाव केला’, असे ते म्हणाले.