एअर इंडियाला इंधन देण्यास नकार

0

नवी दिल्ली- इंधनापोटी एअर इंडियाकडे थकबाकी आहे.त्यामुळे इंडियन ऑइलसह सर्व तेल कंपन्यांनी एअर इंडियाला इंधन पुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आतापर्यंत सहा विमानतळावरील एअर इंडियाचा इंधन पुरवठा थांबवण्यात आला आहे. रांची, मोहाली, पाटणा, विशाखापट्टणम, पुणे आणि कोच्ची या विमानतळांवरील इंधनपुरवठा बंद करण्यात आला आहे.
यापूर्वी देखील सर्व तेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला होता. एअर इंडियाने आतापर्यंत थकबाकीपोटी 60 कोटींची रक्कम दिली आहे.