कोलकत्ता । भारत मध्ये अंडर 17 फीफा वर्ल्ड कप होत आहे.यासाठी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन च्या सल्लागार कमिटीमध्ये एक ही सदस्य पश्चिम बंगालचा सदस्य नाही आहे. त्यामुळे राज्यातील माजी फुटबॉल खेळाडू यामुळे नाराज झाले आहे.ते कायदेशीर कार्यवाही करण्याच्या विचारात आहे. बंगालमध्ये सर्वाधिक फुटबॉल खेळडला जाते.याठिकाणी फुटबॉल पटूची फॅक्टरी आहे.असे म्हटले तरी चालेले मात्र भारतात असणार्या अंडर 17 फीफा वर्ल्ड कप होत आहे.
माजी खेळाडूंची बैठक संपन्न
यासाठी फिफाची कमेटी भारतात आली आहे.त्यांनी जेथे सामने खेळले जाणार आहे.त्याठिकाणच्या मैदानाची पाहणी देखील केली आहे.मात्र दुसरीकडे पश्चिम बंगलाचे माजी खेळाडू यांनी एक बैठक घेवून त्यामध्ये एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल पटेल , राज्य व केंद्राचे क्रिडा मंत्री आणि सचिवांना पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.एआयएफएफने जी सल्लागार कमेटि बनविली आहे.त्यामध्ये माजी खेळाडूंना स्थान नसल्याने अपमानित झाल्यासारखे वाटत आहे. वेळ पडल्यास ते न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.
मान्यवर माजी फुटबॉलपटूंची उपस्थिती
सुभाष भौमिक, सुब्रत भट्टाचार्य, सईद नईमुद्दीन, समरेश चौधरी, मनोरंजन भट्टाचार्य, भास्कर गांगुली, आलोक मुखर्जी, कार्तिक सेठ, प्रशांत चक्रवर्ती यांच्यासह अनेक मान्यवर माजी खेळाडू या बैठकीत उपस्थित होते.या बैठकीत माजी खेळाडूनी यावर चर्चा केली की ही गोष्ट फेडरेशनला कशा प्रकारे सांगायचे.कारण मनोरंजन भट्टाचार्या व भास्कर गांगुली यापुर्वी न्यायालयात गेले आहे.मात्र ती केस न्यायालयात पेडिग पडली आहे. अंडर 17 वर्ल्ड कप 6 – 28 ऑक्टोबर मध्ये खेळला जाणार आहे.