चिंचवड : येथील औद्योगिक शिक्षण मंडळ (एएसएम) महाविद्यालयात सुरू केलेल्या हॉर्वर्ड बिझनेस स्कूलच्या बिझनेस एक्सलन्स कार्यक्रमाचे (एचबीएक्स कोअर) नुकतेच उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ अमित शहा, राजीव खाडे, औद्योगिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप पाचपांडे, सचिव डॉ. आशाताई पाचपांडे आदी उपस्थित होते.
पुढील काळ आव्हानात्मक
यावेळी प्रमोद चौधरी म्हणाले की, सध्या तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे तरुणांनी सातत्याने नवनवीन शिक्षण घेणे आवश्यक आहे. पुढील काळ हा आव्हानात्मक असणार आहे. माहिती व तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल होत आहेत. आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एएसएमने सुरू केलेला हॉर्वर्ड विद्यापीठाचा एक्सलन्स हा नवीन अभ्यासक्रम युवकांना दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ. आशा पाचपांडे यांनी मानले.