एकताच्या यशाची कहाणी

0

डेहराडून । महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुध्दच्या सामन्यात भारताच्या विजयात उत्तराखंडच्या एकता बिश्तची महत्वपूर्ण कामगिरी होती. एकताने 5 बळी घेत पाकिस्तानला मोठा धक्का दिला त्यामुळे तिला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आले. एकताचे वडील कुंदनसिंह बिश्त हे भारतीय लष्करात हवालदार पदावरून निवृत्त झाल्यानंतर 1500 रुपयांच्या पेन्शनवर परिवार चालवणे शक्य नसल्याने चहाचा स्टॉल चालवण्याचा निर्णय घेतला. एकताने सहा वर्षांची असल्यापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मैदानात तिची कामगिरी पाहता आपली मुलगी देशाचे नाव मोठे करेल याची खात्री कुंदनसिंह यांना होती. यासाठी त्यांनी तिला सहकार्य केले.