एकतास उशिरा हजेरी लावत निषेध

0

भुसावळ। आयुध निर्माणीच्या कर्मचार्‍यांनी शासनाच्या कामगार विरोधी धोरणाला विरोध करीत विशेषत: आयुध निर्माणीत तयार होणारे संरक्षण उत्पादन ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली खाजगी क्षेत्रात देण्याच्या विरोधात, देशातील आयुध निर्माणीतील जवळपास 143 उत्पादन सरकारने आदेश काढत खाजगी क्षेत्रांना देण्याचे ठरविले आहे. सरकारी आदेशानुसार भुसावळ आयुध निर्माणीचे जवळपास 16 उत्पादन बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी फेडरेशनने बुधवार 24 रोजी एकतास उशिराने कामावर जाऊन उशिराने हजेरी लावून निषेध नोंदविला. याप्रसंगी मुख्यद्वारावर आयुध निर्माणी कामगार युनियन, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ, मजदूर युनियन इंटक, बहुजन सुरक्षा कर्मचारी संघ, एससीएसटी, ओबीसी असोशिएशन, एआयए एनजीओ असोशिएशन, क्लेरिकल असोशिएशन, सुपरवाईजर असोशिएशन, पॅरामेडीकल, जे.डब्ल्यू.एम. असोशिएशनचे पदाधिकारी एकत्र येऊन आंदोलन यशस्वी केले.

भुसावळ फॅक्टरीत यांनी केले मार्गदर्शन
याप्रसंगी युनियचे पदाधिकार्‍यांनी प्रवेशद्वारावर निदर्शने केली. अजय तायडे, किशोर चौधरी, राम अहिरे, लक्ष्मण वाघ, दिनेश राजगिरे यांनी कामगारांना संबोधित केले. सुत्रसंचालन किशोर बढे यांनी केले. यशस्वीतेसाठी किशोर पाटील, प्रविण मोरे, किशोर सुर्यवंशी, प्रकाश कदम, एम.एस. राऊत, एस.एस. अत्तरदे, संजय अहिरे, सुनिल मोरे, संदीप सोनवणे, नितेश तायडे, एस.आर. पाटील, रवि मेढे, आशिष मनोहर, विक्रमसिंग, अतुल पाटील, विशाल ठाकूर आदींनी परिश्रम घेतले.

वरणगाव फॅक्टरीत द्वारसभा
वरणगांव आयुध निर्माणीमध्ये देखील बुधवार 24 रोजी कामावर एक तास उशिराने जाण्याचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कामगार, इंटक व बीएमएस युनियन या तिनही संघटना सहभागी झाले होते. आंदोलन यशस्वीतेसाठी व्दारसभा घेण्यात आली. सरकार आयुध निर्माणीचे उत्पादन खाजगी कंपन्याना तयार करण्यास देत आहे. आयुध निर्माणीचे खाजगीकरण करीत आहे. या कारणाने कामगाराचे भवितव्य धोक्यात आहे. व देशाच्या सुरक्षितता धोक्यात येणार आहे. सरकारचा हा निर्णय कामगार विरोधी असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. याचा विरोध म्हणून एक तास विलंबाने कामावर जावुन सरकारला इशारा देण्यात येत आहे. आंदोलन यशस्वीतेसाठी कामगार युनियनचे महासची व सुनिल महाजन, इंटकचे महासचिव महेश पाटील, बीएमएसचे प्रभारी महासचिव सुरेश बत्तीरो सर्व कार्यसमिती सदस्य
परिश्रम घेत आहेत.

कंत्राटी कामगारांचे शोषण
तसेच आयुध निर्माणीत कंत्राटी कामगारांचे शोषण होत आहे. त्यांना वेळेवर पगार मिळत नाही. मार्च एप्रिल महिन्याचा पगार कामगारांना अद्यापही मिळालेला नाही. महाप्रबंधकांकडे समस्या मांडूनही कामगारांना दिलासा मिळालेला नाही. या प्रकाराला विरोध करणार्‍या कामगारांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांसह डीवायएसपी, कामगार कल्याण मंत्रालय आण श्रम मंत्रालयाला निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती ठेका कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र झा यांनी पत्रकाद्वारे कळवली आहे.