जळगाव: आयुष्य सरळ सोपे आहे, परंतु मनुष्य त्याला गुंतागुंतींचे करतो. नियोजनबध्द आयुष्य जगताना आयुष्याचे प्रयोजन आणि पैशांचे नियोजन कसे करावे, याचा फंडा जळगावकरांनी जाणून घेतला. एकता रिटेल किरणा मर्चंट्स नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित अर्थपूर्ण कार्यक्रमाच्या मेजवानीत तीन तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
एकता रिटेल किराणा पतसंस्थेतर्फे अर्थपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमात आर्थिक नियोजनात आपल्याला उत्तम करण्यासाठी गुंतवणुकीची बाराखडी या विषयावर मुंबई येथील मिलन पांड्या यांनी तर आपण आपल्या आरोग्यासाठी आपण करावयाचे नियोजन या विषयावर स्टार हेल्थ अॅन्ड अलाईड इन्शुरन्सचे सहाय्यक क्षेत्र प्रबंधक अरूण महाजन यांनी मार्गदर्शन केले. लव्ह यु जिंदगी या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते मनोज गोविंदवार यांनी संवाद साधला.
आयुष्याचं प्रयोजन आणि पैशाचं नियोजन या दोन गोष्टी जीवनाचा ताळेबंद यशस्वी करतात, याबाबत वक्त्यांनी सविस्तर सांगितले. कार्यक्रमासाठी अध्यक्ष ललीत बरडीया, उपाध्यक्ष घनश्यामदास अडवाणी, संचालक गायत्री कुलकर्णी, राजेश आहुजा, दयानंद कटारीया, नामदेव वंजारी पतसंस्थेच्या मुख्याधिकारी प्रणिता कोलते यांच्यासह सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रम ऐकणार्यांनी सभागृह खच्चून भरले होते. उपस्थित श्रोत्यांमधून कार्यक्रमाच्या शेवटी लकी ड्रॉ व्दारे नशीबवान श्रोता निवडण्यात आला.