जळगाव । येथील एकता मित्र दुर्गोत्सव मंडळाच्या सर्व सदस्यांची बैठक संस्थापक अध्यक्ष प्रदिप श्रीश्रीमाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मलखान पवार, डॉ. दिलिप मुंडे, लोटू पाटील, योगेश विसपुते, संतोष पटके, राजेश चव्हाण, सुनिल श्रीश्रीमाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. एकता मित्र मंडळाचे हे 25 वे वर्ष असून अविरतपणे सूरू आहे. बैठकीत वर्ष 2016 मध्ये एकाता मित्र मंडळातर्फे केल्या गेलेल्या कार्याची माहिती अध्यक्षांनी उपस्थिताना दिली यासोबत संस्थेत ज्यांनी अविरत पणे तन, मन, धनाने कार्य केले त्यांचा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे पुस्तकाने सम्मान झाला.
मंडळाची नियोजित कार्यकारिणी
संस्थेच्या या बैठकीत कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली अध्यक्ष चेतन परदेशी, उपाध्यक्ष तेजस श्रीश्रीमाळ, सचिव सचिन जोशी, सहसचिव रोजन महाजन, कार्याध्यक्ष निलेश धारीडा, सहकार्य अध्यक्ष शरद नारळे, खजीनदार योगेश सारस्वत, सहखजीनदार पवन कोळी, समन्वयक हर्षल मुंडे, मिरवणूक प्रमुख भूषण जावळे यांचेसह सदस्य यश श्रीश्रीमाळ, कुशल चौधरी, स्वप्नील चौधरी, उज्जवल मुंडे, मोहित चव्हाण, बंटी परदेशी, सौरभ चौधरी, उमेश कोळी, चेतन इंगळे, स्वप्नील माळी, चेतन सपकाळे, राहूल पाटील, अनुराग शर्मा, मोहन पाटील, पंकज विसपुते, यश पवार, सचिन बेडिसकर, प्रसन्न बागुल. आदेश सोनवणे, बंटी चव्हाण दिपक परदेशी यांची निवड करण्यात आली. यावेळी अंबे माँ हे दुर्गादेविचे स्थापनेच्या दिवशी ‘शिवझेप’ ढोल – ताशांचे विशेष 50 वादकांचे पथक मागविलेले आसून मोठ्या थाटात दुर्गादेविची स्थापना करण्यात येणार आहे.