एकता रिटेल पतसंस्थेतर्फे 10 लाख रुपयांची चिल्लर वाटप

0

जळगाव । येथील एकता रिटेल किराणा मर्चंट सहकारी पतसंस्थेतर्फे सोमवारी चिल्लर मेळावा घेण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष ललिलभाई बरडिया, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनीभाई मेमन, बच्चनकुमार चावला आणि पतसंस्थेच्या सीईओ प्रणिता कोलते यांच्या हस्ते संस्थेच्या नविपेठेतील कार्यालयात उपस्थितांना चिल्लर वाटप करण्यात आले. यावेळी 10 लाख रुपयांची चिल्लर वाटप करण्यात आली असून कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

लोकांच्या हितासाठी उपक्रम
पतसंस्थेचे अध्यक्ष ललितभाई बरडिया प्रास्ताविकात म्हणाले की, गेल्या 3 वर्षांपासून पतसंस्था चिल्लर वाटप करीत असून हा जवळपास 25 वा कार्यक्रम आहे. आतापर्यंत लोकांना 2 कोटी रुपयांवर चिल्लरचे वाटप झालेले आहे. या कार्यक्रमासाठी आम्हाला आरबीआयचे मिळते. सभासद व लोकांच्या हिताचे उपक्रम राबविण्याला संस्था प्राधान्य देते. यावेळी माठ्या संख्येने इतर नागरिकही उपस्थित होते. तसेच एकता रिटेलच्या उपक्रमाबाबत कार्यक्रमात नागरिकांना माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

उपक्रमाचे केले कौतूक
एकता रिटेल पतसंस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चिल्लर वाटप कार्यक्रमात प्रत्येकाला 5 हजार रुपयांची चिल्लर देण्यात आली. त्यात 1,2,5 आणि 10 रुपयांच्या डॉलरचा समावेश होता. यावेळी गनीभाई मेमन यांनी एकता रिटेल पतसंस्थेमार्फत घेण्यात येणार्‍या सर्व उपक्रमांचे कौतुक केले. लोकांच्या गरजा ओळखून ही पतसंस्था काम करते. 10 टक्के सूट देत ब्रॅण्डेड कंपनीचे हेल्मेट वाटप, चिल्लर वाटप असे कार्यक्रम घेतल्यामुळे ही संस्था समाजाभिमुख काम करीत आहे असे मत गनी मेमन यांनी व्यक्त केले.