एकत्रित समाज असेल तरच सामूहिक विकास-जैन

0

जळगाव । सर्वसमाज एकत्रित राहिला तर समाजाचा सामूहिक विकास गतीने होतो, असे प्रतिपादन आमदार सुरेश जैन यांनी केले. पिंप्राळ्यातील नगरसेवक अमर जैन यांच्या सुशांती मित्रमंडळ जिल्हा पत्रकार संघातर्फे शुक्रवारी पिंप्राळा मशिदीजवळ ईदमिलनाचा कार्यक्रम झाला. आमिरसाहब यांनी रमजान, ईद जकात यांचे महत्त्व सांगितले. यात त्यांनी रमजानचा महिना म्हणजे मानवी व्रताचा महिना असतो. त्यात कठोर बंधने पाळून राहावे लागते.

जकातीच्या स्वरूपात दानधर्म करून समाजाप्रती आपले कर्तव्य पूर्ण केले जाते, असे सांगितले. त्यानंतर गफ्फार मलिक करीम सालार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून गनी मेमन, विष्णू पाटील, श्याम कोगटा उपस्थित होते. स्वागत अमर जैन यांनी केले. साजिद अली, पप्पू पठाण, नादिर शेख, शेख सज्जो, नदीम, सतीश साळी, देविदास पाटील, मोहन वाणी, जितू बाविस्कर, दिवाणसिंग सोनवणे, संजय सोमाणी आदींनी सहकार्य केले. फारुख शेख यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप तिवारी यांनी आभार मानले.