एकदिवसीय मालिकेसाठी धोनीची जोरदार तयारी

0

दाम्बुला । येत्या रविवारपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणार्‍या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोणीने कसून भरपूर सराव केला. या दरम्यान धोणीसह केदार जाधव, मनीष पांडे, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहने देखील सराव केला. आकर्षणाचा केंद्र अर्थातच धोणी होता कारण धोणी त्याच्या भविष्या बद्दल नेहमी चर्चेत असतो. त्याने मैदानावर भारतीय आणि श्रीलकेंच्या गोलंदाजांसमोर फलंदाजीचा सराव केला. धोणी एक महिना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. पण त्याने भरपूर सराव करुन वेगवान आणि फिरकी गोलंदाजांच्या विरोधात चांगल्या कामगिरीसाठी मेहनत घेतली. या दरम्यान त्याने काही आकर्षक शॉट्स देखील खेळले. प्रसादने अनेकदा धोनीचा बचाव केला आहे. 35 व्या वर्षानंतर पण खेळाडू चांगला खेळू शकतो हे त्याने सांगितलं.