एकनाथराव खडसेंना कोरोनाची लागण

0

जळगाव: माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली असली तरी सिटीस्कॅन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ते उपचारासाठी मुंबईला जाणार आहेत. बॉम्बे हॉस्पिटलला ते उपचार घेणार आहे, स्वतः खडसे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

काही दिवसांपूर्वी खडसे यांची कन्या जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर आता एकनाथराव खडसे यांना कोरोनाची बाधा झाली आहे.