भुसावळ । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार, 2 रोजी सायंकाळी नाहाटा चौफुलीवर भाजपा पदाधिकार्यांसह नगराध्यक्ष रमण भोळे हे त्यांचा सत्कार करणार आहेत. दिवसभरात रुग्णांना फळ वाटप तसेच अन्य उपक्रम राबवण्यात येणार आहेत. पालिकेच्या विविध विकासकामांचा आढावा सादर होणार असून कामांना सुरवातही होणार आहे.