एकपात्री प्रयोगातून स्वामी विवेकानंदांच्या पैलूंवर प्रकाश

0

भुसावळ । स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद या गुरूशिष्याचे प्रचंड विचारांची देवाणघेवाण घेवून दृढ झाले होते. अध्यात्मिक विचारसरणीतून सर्वसामान्यांना आनंदी करण्यावर दोघांचा भर होता. अशा दिव्य गुरूशिष्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्याचे काम ‘ठाकूर और मैं’ या एकपात्री प्रयोगातून नाट्यलेखक तथा दिग्दर्शक नितीश शकुंतला धनराज वाघ यांनी केले.

खान्देशचा सुपुत्र नाट्यलेखक तथा दिग्दर्शक आणि विशेष म्हणजे आपल्या आईचे नाव आपल्या नावापुढे जोडणारे कलावंत नितीन शकुंतला धनराज वाघ 15 रोजी भुसावळात तीन ठिकाणी ‘ठाकूर और मैं’ हा 55 मिनीटांचा एकपात्री प्रयोग सादर केला. सकाळी 9 वाजता नाहाटा महाविद्यालय, दुपारी 3 वाजात जैन सोशल गृपतर्फे ओसवाल पंचायती वाडा आणि त्याच ठिकाणी सायंकाळी 7 वाजता ज्ञानासह मनोरंजन हाच हेतू गृपतर्फे नाट्यप्रयोग सादर झाला. नाहाटा महाविद्यालयातर्फे प्राचार्या डॉ. मिनाक्षी वायकोळे, जैन सोशल गृपतर्फे प्रशांत कोटेचा तर ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे डॉ. जगदीश पाटील यांनी आयोजन केले. तीनही नाट्यप्रयोगाचे संयोजन प्रा.डॉ. दिलीप ललवाणी केले. या एकपात्री प्रयोगात कन्याकुमारी येथील खडकावर बसून स्वामी विवेकानंदानी केलेले चिंतन उत्कृष्टरित्या साकारण्यात आले. गुरूंच्या सान्निध्यात राहून असंख्य विषयांवर चर्चा करून व विचार ग्रहण करून गुरूशिष्याचे नाते दृढ झाले. सामान्य लोकांना जाणून घेवून देशाला जाणता येईल असा गुरूंचा आदेश शिरसावंद्य मानून विवेकांनद भारतभ्रमण केले. त्यांना सर्वदूर गरीबी, दरिद्रता, अज्ञान दिसले. तेव्हा त्यांनी लोकांसाठी काम करण्याचे ठरवले. परखड व्यक्तिमत्व तथा स्पष्टवक्तेपणा, ज्ञानाचा सागर, अध्यात्माचा गाढा अभ्यास, ध्यानयोगी अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण वेध एकपात्री प्रयोगाने घेतला. भूतकाळ व वर्तमानकाळात सादर करत करत भविष्याचा विचार देखील अनेक वेळा केला जात होता. तीनही ठिकाणचे प्रयोग अप्रतिम झाले. रसिक श्रोत्यांच्या उदंड प्रतिसाद मिळाला.