पुणे : कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणात शिक्रापूर पोलिस ठाण्यात अॅट्रोसिटीच्या विविध कलमांनुसार समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता एकबोटे यांचे वकील चिंतामणी घाटे यांनी न्यायालयात अर्ज केला आहे. विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांच्या न्यायालयाने 22 जानेवारीरोजी सदर अर्जावर सुनावणी करण्यात येईल, असे आदेश दिले आहेत. शिरुर तालुक्यात कोरेगाव-भीमा येथे एक जानेवारीरोजी विजय स्तभंला मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आले असताना, दोन गटात दंगल घडली होती. याप्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्यावर भादंवि कलम 307, 143, 147,148, 149, 295 (अ), 435, 436, शस्त्र कायदा 4,5 नुसार गुन्हा दाखल आहेत.