20 फेब्रुवारीपर्यंत अटकपूर्व संरक्षण
नवी दिल्ली : भीमा कोरेगाव हिंसाचार व दंगलप्रकरणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले हिंदू एकता आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 20 फेब्रुवारीला होणार असून, तोपर्यंत एकबोटे यांना अटकपूर्व संरक्षण प्राप्त राहणार आहे.
याआधी मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावला होता. त्यामुळे एकबोटे यांना कोणत्याहीक्षणी अटकेची शक्यता वर्तवण्यात येत होती. बुधवारी न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर एकबोटे यांनी अटक टाळण्यासाठी ताबडतोब दुसर्या खंडपीठाकडे धाव घेतली होती. मात्र या खंडपीठाकडूनदेखील त्यांना दिलासा मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती.