एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून तरुणाचा वाघळीत खून

Chalisgaon taluka rocked by murder : The murder of a young man in Waghli over a petty dispute चाळीसगाव : तालुक्यातील वाघळी येथे एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून शाब्दीक वाद विकोपाला गेल्यानंतर पाच जणांच्या टोळक्याने वाघळीतील 18 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना बुधवार, 12 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, मोहन विजय हाडपे (18) या तरुणाच्या खून प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

किरकोळ वाद बेतला जीवावर
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील व्यायाम शाळेजवळ मोहन विजय हाडपे (18) व त्यांचा मित्र प्रवीण पुरूषोत्तम धनगर यांना एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून बुधवारी सायंकाळी लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही मारहाण सुरू असताना मोहनचे काका रवींद्र भास्कर हाडपे व सुनील सुभाष धनगर यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली होती. त्यानंतर गावातील तलाठी कार्यालयाजवळ तनवीर साजीद खाटीक व समीर साजीद खाटीक यांनी मोहन विजय हाडपे (18) याचे दोन्ही हात पकडले तर आदिल साजीद खाटीक याने आपल्या हातात असलेला चाकूचे वार करीत मोहन हाडपे या तरुणाची हत्या केली.

या आरोपींविरोधात गुन्हा
तरुणाच्या खून प्रकरणी रवींद्र भास्कर हाडपे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात सैय्यद मुसा खाटीक, साजीद मुसा खाटीक, आदिल साजीद खाटीक, तनवीर साजीद खाटीक व समीर सैयद खाटीक (सर्व रा.वाघळी, ता.चाळीसगाव) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास उपनिरीक्षक कुणाल चव्हाण हे करीत आहेत.