एकलव्य क्रिडा संकुलात रंगला फुटबॉल सामना

0

जळगाव । मु.जे. महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुलातर्फे मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्याचे रविवारी आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी फुटबॉलला कीक मारून या सामन्याचे उद्घाटन केले. ब.गो. शानबाग विद्यालय आणि ओरीयन इंग्लिश मेडीयम स्कूल यांच्यात सामना झाला. शानभाग विद्यालयाने 2-0 सामना जिंकला. जिल्हाधिकार्‍यांनी खेळाडूंशी हस्तांदोलन करून परिचय करून घेतला आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी एकलव्य क्रीडा संकुलाच्या स्वच्छतेचे कौतुक केले.

याप्रसंगी जळगाव फर्स्टचे डॉ. राधेशाम चौधरी, एकलव्य क्रीडा संकुलाचे विभागप्रमुख श्रीकृष्ण बेलोरकर, रणजीत पाटील, सचिन महाजन हे उपस्थित होते. या मैत्रीपूर्ण सामन्याच्या आयोजनासाठी अजय पाटील, सुश्मिता भालेराव, केतन कोल्हे आणि विनोद वंडोळे यांनी परिश्रम घेतले.