जळगाव। मू.जे.महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकूलमध्ये 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी 500 हुन अधिक विद्यार्थी खेळाडूंनी या शिबीरात सहभाग घेतला. विविध खेळ प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात आले. नाईट कॅम्प, डे्रझर हंड व घोडा सवारीचाही आनंदही खेळाडूंनी घेतला. तज्ञ प्रशिक्षकांद्वारे सर्व खेळांचे प्रशिक्षण दिले गेले.
प्रशिक्षणार्थींना सोमवारी 15 रोजी बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी डी.व्ही.चौधरी, सुषमा कंची, प्रा.जी.सी.कुळकर्णी, डॉ.उदय कुळकर्णी, रणजीत पाटील आदी उपस्थित होते. सर्व प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील सादरीकरण करण्यात आले. उत्कृष्ट शिबीरार्थी विपुल उत्तरदे, रिद्धी पाटील, उमेश अत्तरदे, वेदोसी वाणी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात
आले.