एकलव्य निवासी शाळेसाठी भूखंड उलब्ध करा

0

पिंपळनेर : आदिवासी विभागाच्या मंजुर एकलव्य निवासी इंग्रजी माध्यमच्या शाळेच्या इमारतीसाठी स्वंतत्र भूखंड उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान साक्री शाखेच्या वतीने अपर तहसिलदार सूर्यवंशी यांच्राकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शासनाने या प्रलंबित प्रश्‍नांकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा असेही निवेदनात म्हटले आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी तहसिलदारांना निवेदन
पिंपळनेर येथे केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाने सन 2007-08 मध्ये एकलव्य रेसिडेंशिनल इग्लिश मेडियम स्कुल मंजुर केली असून अद्यापही स्वतंत्र जागा उपलब्ध नाही. इग्रंजी शिक्षणासाठी आदिवासी समाजाच्या मुलांची गैरसोय होत आहे. इमारत बांधकामासाठी स्वतंत्र जागा मिळाल्यास विद्यार्थ्यांना भविष्यात अडचणींचा साभना करावा लागणार नाही. एकलव्य (निवासी ) रेसिडेन्शिनल इग्रंजी माध्यम शाळेच्या इमारतीसाठी सुकापूर ग्रामपंचायतीने दि.26 जानेवारी 2018 च्या ग्रामसभेत गट नं.137 पैकी क्षेत्रातील 20 एकर भूकंपाचा ठराव करण्यात आला आहे. यापूर्वी ही पिंपळनेर-पखरूण ग्रामपंचायतीनेही जागा देण्याचे ठरवले होते. सुकापूर ग्रामपंचायतीने ठराव केलेला भूखंड ताब्यात घेण्यासाठी योग्य कार्यवाही साठी प्रस्ताव तयार करावा व तसा अहवाल आदिवासी विकास विभागाच्या संबंधित यंत्रणेकडे सादर करावा अशी मागणी साक्री तालुका आदिवासी बचाव अभियानाचे मांगिलाल गांगुर्डे, तानाजी बहिरम,गणेश गावित, सुनील साबळे, ईश्‍वर गायकवाड, अर्जुन माळी,चमारू पवार, सयाजी चौरे,विजय सूर्यवंशी किशोर कोकणी व द्याल बहिरम या पदाधिकार्‍यांनी अपर तहसिल येथे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. आमदार डी. एस. अहिरे यांना ही अशा आशयाचे निवेदन दिले आहे.