एकलव्य पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रियेस सुरूवात

0

धुळे (प्रतिनिधी) – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत असणार्‍या मान्यताप्राप्त शाळेतील विद्यार्थ्यांकरीता सदस्य सचिव, महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी, नाशिक तथा आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांचे अधिनस्त असलेल्या अनुसूचित जमाती व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी एकलव्य रेसिडेन्शीयल पब्लिक स्कूलमधील 2017-2018 या शैक्षणिक वर्षांत 6 वीच्या वर्गात प्रवेशासाठी प्रक्रियेस सुरवात झाली आहे. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांनी ही माहिती दिली आहे.

अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य
इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेन्शीयल पब्लिक स्कूलमध्ये 2017- 2018 या शैक्षणिक वर्षांत प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा 2016- 2017 या चालू शैक्षणिक वर्षांत पाचवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. 5 मार्च 2017 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत शिरपूर, शिंदखेडा व धुळे तालुक्यातील सर्व शाळांसाठी अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा, वर्शी, ता. शिंदखेडा, जि. धुळे येथे, तर साक्री तालुक्यातील सर्व शाळांसाठी अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा, पिंपळनेर, ता. साक्री येथे परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी हा अनुसूचित जमाती व आदिम जमातीचा असावा, तसेच पात्रतेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे : विद्यार्थी/विद्यार्थिनी शैक्षणिक वर्ष 2016- 2017 मध्ये पाचवीत शिक्षण घेणारा असावा. पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे, पालक शासकीय, निमशासकीय सेवेत नसावा. प्रवेश अर्ज 5 ते 31 डिसेंबर 2016 पर्यंत उपलब्ध होतील.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पेठ रोड, नाशिक, पिंप्री सद्रोद्दीन इगतपुरी, जि. नाशिक, नंदुरबार, अजमेर सौंदाणे, ता. बागलाण, जि. नाशिक आदी इयत्ता 6 वीच्या वर्गात 2017- 2018 या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात येईल.