बेटावद । अमळनेर तालुक्यातील एक लहरे गावांजवळचा राज्य मार्ग क्रं 6 वरील रेल्वे बोगदा अवजड वाहनांसाठी अपयशी ठरलेला असून रेल्वे बोगद्याजवळ उड्डाण पुलकरण्यात यावा असी मागणी अमळनेर शिंदखेडा या दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांमधून केली जात आहे. 1992 पूर्वी बेटावद अमळनेर हा जिल्हामार्ग म्हणून अस्तित्वात होता. परंतू गुजरात राज्य मध्यप्रदेश या दोन्ही राज्यातून जळगाव जाण्यासाठी शिवाय नंदुरबार , धुळे , जळगाव या तिन्ही जिल्ह्यांना दळणवळणाचा दुष्टी कोणातून जोडण्यासाठी शासनाने 1992 मध्ये बेटावद गावांजवळ पांझरा नदीवर पूल उभारून त्याचे जोड रस्ते वाहतुकीस खुले केले. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा विचार करून जिल्हा मार्गाचे नागपूर अंकलेश्वर राज्य मार्ग क्रं 6 मध्ये रूपांतर झाले.
दिवसभरात 200 ते 250 वाहनांची वाहतूक
यामुळे आज मितीस या मार्गावर दिवसभरातून 200 ते 250 वाहने वापरीत आहेत. हामार्ग एक लहरे ता. अमळनेर या गांवावरून गेलेला असल्याने एक लहरे गांवाचा पुढे एका अरुंद अशा रेल्वे बोगद्यातून हा मार्ग पुढे सरकतो. या बोगद्यातून जेमतेम बस निघू शकते अशा कमी उंचीचा हा बोगदा असल्याने दळणवळणाचा दुष्टी कोणातून या दोन्ही तालुक्यांची प्रगती या रेल्वे बोगद्यामुळे होऊ शकत नाही हे सुध्दा नाकारून चालणार नाही.
लाल फितीचा फटका
वास्ताविक या बोगद्याजवळ उड्डाण पुल व्हावा म्हणून अमळनेर व शिंदखेडा तालुक्यातील ग्रामस्थ वेळोवेळी मागण्या करीत आहेत. परंतू जळगांव जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींचे दुर्लक्ष या बोगद्याला कारणीभूत ठरलेला आहे अशी चर्चा होतांना दिसत आहे. वास्तविक अनेक वेळा या ठिकाणी होणार्या उड्डाण पुलाचे मोजमाप झाल्याचेही म्हटले जाते. परंतू, त्याचा मुर्हुत लाल फितीत अडकल्याचे म्हटले जाते.
जळगाव जिल्ह्यातील खासदारांवर नाराजी
हा बोगदा अरुंद असल्याने जळगांवकडून नंदुरबार किंवा गुजरातमध्ये प्रदेशकडे जाणारी वाहने धुळे मार्ग जातात. जर या ठिकाणी उड्डाण पुल झाला तर ही वाहने अती शॉर्टकट एक लहरे बेटावद नरडाणामार्गे दोन्ही राज्यात जाऊ शकतात. परंतू, जळगाव जिल्ह्यातील लोकसभा सदस्यांचे दुर्लक्ष कारणीभूत ठरल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे खासदार ए . टी पाटील, खा. रक्षा खडसे तसेच धुळ्याचे खा. तथा भारताचे संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे, नंदुरबारचे खा. डॉ.हिना गावीत आदींनी याबाबत पाठ पुरावा केल्यास रेल्वे बोगद्याजवळ उड्डाण पुल होण्यास वेळ लागणार नाही.