एकविसाव्या शतकात वाणिज्य शाखेच्या अद्यावत ज्ञानाची कास धरावी

0

डॉ.अमिषी अरोरा ; बोदवड महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य वाणिज्य परीषछेच्या अधिवेशनाचे उद्घाटन

बोदवड- कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य वाणिज्य अधिवेशनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य वाणिज्य परीषदेचे अध्यक्ष डॉ. अमिषी अरोरा यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने झाले. महाराष्ट्र राज्य वाणिज्य परीषदेचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे (नागपूर), राज्य वाणिज्य परीरषदेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.टी.ए.शिवारे (मुंबई), सचिव प्राचार्य जी.वाय शितोळे (पुणे), कोषाध्यक्ष, व कार्यकारणी सदस्य तसेच परिषदेचे संस्थापक डॉ. जी. एम. तल्लार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोदवड सार्वजनिक को-ऑपरेटिव्ह एज्युकेशन सोसायटी लिमिटेड बोदवड संस्थेचे चेअरमन मिठुलाल अग्रवाल, संस्थेचे उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेचा, ज्येष्ठ संचालक अ‍ॅड.प्रकाशचंदजी सुराणा, श्रीरामभाऊ बडगुजर, रवींद्र माटे, सुभाष शर्मा, बोदवडच्या नगराध्यक्षा मुमताज बी.शेख सईद बागवान आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध संशोधकांचे लेखांचा समावेश असलेली सीडीचे अनावरण करण्यात आले. परीषदेला देशातील व राज्यातील सुमारे 375 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते.