एकवीरा देवी गडावर स्वच्छता मोहिम

0

नेरुळ : कार्ला गडावर भरणाऱ्या एकविरा देवीच्या यात्रेला नवी मुंबईतील जुईनगर येथील गावदेवी युवा मित्र मंडळाच्या वतीने स्वछता अभियान राबविण्यात आले.यात कित्येक गोणी कचरा गोळा करण्यात आला.अध्यक्ष शैलेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळ पास १५० तरुणांनी यात सहभाग नोदंवित समाजसमोर नवा आदर्श ठेवला आहे. लोणावळा येथील कार्ला गडावरील एकविरा देवी ही संबंध आगरी कोळी बांधवांचे दैवत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे भाविकांची नेहमीच दर्शनाससाठी रिघ लागलेली असते.

तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून देखील आगरी कोळी बांधवांव्यतिरिक्त इतर जातीय भाविक देवीचे दर्शन घेण्यास येत असतात .मात्र येथे येताना आपल्यासोबत घेऊन येणारे प्लस्टिकच्यावस्तू प्लेट्स,चहाचे कप,ग्लास, वाट्या,पाण्याच्या बाटल्या, वेफर्सची पाकिटे या वस्तू तिथेच टाकली जातात. त्यामुळे गडावर व गड परिसरात कचऱ्याचे प्रमाण वाढते.

ज्या प्रमाणे आपण आपले घर स्वछ ठेवण्यात नेहमीच भर देत असतो त्याच धर्तीवर आपल्या आराध्य दैवतांचे घर ,आंगण ही साफ ठेवणे हे आपले दायित्व आहे असे अध्यक्ष शैलेश भोईर यांनी सांगितले आणि हा स्वछता अभियान राबविण्याचे त्यांनी ठरविले. त्यास नवी मुंबईतील तरुणांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सर्व तरुणांचे आभार मानले व या पुढे ही मंडळाच्या वतीने गडावर सातत्याने स्वछता अभियान राबविणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. या मोहिमेत कोपरी गावातील तरुण अक्षय ठाकूर,तेजस भोईर,शुभम ठाकूर,नितीन ठाकूर,भावेश म्हात्रे उपस्थित होते.