जळगाव- शासनाकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी १२ शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती महाबीडीटी पोर्टलवर भरावी, ही माहिती अद्यायावत करत असताना संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी यामध्ये विशेष लक्ष द्यावे आणि एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सुचना उच्च शिक्षण सहसंचालन डॉ.केशव तुपे यांनी केली.
महाराष्ट्र शासनातर्फे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यृवत्ती सुरू केली असून त्या करिता पायलट प्रोजेक्ट म्हणून शहरातील मु़जे़ महाविद्यालय तसेच नंदुरबार येथील जिजामाता महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती संदर्भात जिल्ह्यातील प्राचार्यंसह लिपिकांना प्रशिक्षण देण्यासाठी बुधवारी दुपारी १२ वाजता मु़जे़ महाविद्यालयात ‘प्रशिक्षण शिबिर’ घेण्यात आले़ यावेळी व्यासपीठावर मु़जे़ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉउदय कुळर्णी व उच्च शिक्षण कार्यालयाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी राम राठोड उपस्थित होते.
शिबिराच्या सुरूवातील राठोड यांनी शासनाच्या महाडीबीटी या पोर्टलवर महाविद्यालयांनी माहिती कशी भरावी यावर पीपीटीद्वारे प्रेझेंन्टशन दाखवून माहिती सांगितली. \ याप्रसंगी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व लिपीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्यांनी स्वत: पोर्टल समजून घ्या़़़
मंगळवारपासून विद्यार्थ्यांची पोर्टलवर माहिती भरणे सुरू झाले आहेत़ त्यामुळे पोर्टल व संकेतस्थळाची पूर्ण माहिती लिपीकाला माहिती असली तर प्राचार्यांनी देखील स्वत: संकेतस्थळाची व पोर्टलची माहिती घेऊन ती समजून घेणे, ही प्राचार्यांची देखील जबाबदारी आहे़ तसेच आपला मोबाईल क्रमांक हा आधारशी लिंक झालेलाच पाहिजे, असेही डॉ़ तुपे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले़