An adult in Jalgaon was threatened with a viral nude call and demanded an extortion of two lakhs
जळगाव : फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर समोरील महिलेने एकांतात अश्लील चित्रण व्हायरल करण्याची धमकी देत जळगावातील प्रौढाकडे दोन लाखांची मागणी केली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात अज्ञात तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यूड कॉल व्हायरलची धमकी
शहरातील एका परीसरातील 40 वर्षीय पुरुषाला शनिवार, 8 रोजी फेसबुकवर एका मुलीच्या नावाने रीक्वेस्ट आली. संबंधित व्यक्तीने ती रीक्वेस्ट स्वीकारली. यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. यानंतर संबंधित महिलेने त्या व्यक्तीचा व्हॉटसअॅप नंबर घेतला व त्या पुरुषाला एकांतात येवून कपडे काढायला सांगितले. त्या महिलेने व्हिडीओ कॉल करीत तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून घेतला. यानंतर त्या 40 वर्षीय पुरुषाला दोन लाख रुपये मागितले. तसेच पैसे न दिल्यास तुझा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तसेच तुझ्या व्हॉटसअपवर पाठवेल अशी धमकी देत दोन लाखांची मागणी केली.
सायबर पोलिसात गुन्हा
या प्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीने तत्काळ जळगाव शहरातील सायबर पोलिस स्थानक गाठत संबधित तरुणीच्या नावाने बनविलेल्या खाते धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.