एकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

0

जळगाव । एमआयडीसी परिसरातील श्री गणेश इंडस्ट्रीजमध्ये काम करणार्‍या कामगारानेच 4 जानेवारी रोजी मालकाच्या कॅबीनमधून 24 हजाराचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.

संशयितास न्यायालयात केले हजर
एमआयडीसीतील सी सेक्टरमधील प्लॉट क्र. 32 मध्ये श्री गणेश इंडस्ट्रीज मध्ये 4 जानेवारी रोजी कंपनीच्या मालकाच्या कॅबीनमधील 24 हजारांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी संशयीत गोविंदसिंग शेरसिंग ठाकुर – राजपुत (वय 20, रा. साईनगर) याला अटक केली होती. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्याला न्यायाधीश पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील दुसरा संशयीत मोतीलाल चंद्रकांत तितरे (वय 24, रा. साईनगर) हा न्यायालयीन कोठडीत आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.