एकाच क्रमांकाच्या चारचाकीप्रकरणी जामीन

0

जळगाव। एकाच क्रमांकाच्या दोन चारचाकी आढळून आल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. तर यातील एका चारचाकीला बनावट नंबर प्लेट लावून तसेच वाहनाची नोंदणी केली नसल्याने लाख 72 हजार 751 रुपयांचा महसूल बुडवून शासनाची फसवणूक केल्याने चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. शनिवारी रात्री तिन जणांना अटक करण्यात येवून रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे.

यांच्याविरुध्द दाखल आहे गुन्हा
या प्रकरणात शनिवारी ऋषिकेश गोपाळ गरूड (रा.शेंदुर्णी), राजू रामदास महाजन (रा.श्रीहरीनगर, गणेश कॉलनी, जळगाव), निखिल रमेश गोडांबे (रा.अहमदनगर) नरेंद्र विठ्ठल वारके (रा.चंद्रप्रभा कॉलनी, रिंगरोड, जळगाव) यांच्या विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांनी संगनमत करून जानेवारी 2014 पासून संबधित चारचाकीची कोणतीही नोंदणी करता बनावट नंबर प्लेट लावून चारचाकी वापरली.

त्यामुळे शासनाचा लाख 72 हजार 751 रुपयांचा महसूल बुडाला आहे, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. समान क्रमांकाची नंबरप्लेट वापरलीच त्यावर पुन्हा शासनाचा महसूल बुडविला म्हणून गुन्हादाखल झाल्यानंतर पोलिसांनी गरूड, गोडांबे वारके या तिघांना अटक केली. दरम्यान, रविवारी तिघांना न्यायालयात हजर करण्यात येवून याप्रकरणावर कामकाज झाले. तिघांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने मंजूर केला असून तिघांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.