नवी दिल्ली-दिल्लीमध्ये बुराडी येथील संत नगरमध्ये रविवारी सकाळी एकाच घरात ११ मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यातील काही मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत, तर काही मृतदेहांचे हात-पाय बांधून ठेवण्यात आले होते. याशिवाय काही मृतदेहांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेलीही आढळली आहे. ११ मृतदेहांपैकी ७ मृतदेह महिलांचे आणि ४ पुरुषांचे असल्याची माहिती आहे. या सर्वांनी सामूहिक आत्महत्या केली की कोणी त्यांची हत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
#Visuals from Delhi’s Burari where bodies of 7 women and 4 men have been found at a house; Police present at the spot, investigation on. pic.twitter.com/CjuReQbaXT
— ANI (@ANI) July 1, 2018