एकाच दिवशी मुख्यसभेत 4 सभापती

0

पुणे । महापालिकेच्या मुख्य सभेत आज अनोखे दृश्य पहिला मिळाले. महापालिकेच्या होणार्‍या मुख्यसभा सभापती म्हणून चालवण्याचा बहुमान हा महापौरांचा असतो त्यांच्या अनुपस्थितीत उपमहापौर कामकाज पाहतात मात्र सोमवारी महापौर मुक्ता टिळक यांना काही कामकाजामुळे बाहेर जावे लागले आणि त्यावेळी उपमहापौरदेखील अनुपस्थित असल्यामुळे पालिकेच्या 3 सभासदांना सभापती होण्याची संधी मिळाली.

नेहमीप्रमाणे कामकाज सोमवारी 3 वा. सुरू झाले. कामकाज सभापती म्हणून महापौर पाहत होत्या मात्र काही कामानिमित्त बाहेर जाणे आवश्यक असल्याने सभापती म्हणून ती जबाबदारी उपमहापौरांची होती. तेदेखील अनुपस्थित असल्याने राष्टवादीच्या सभासद सुमन पाठारे यांना सभापतीपदी बसण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती सभा तहकूब करून पुढची सभा सुरू करण्यात आली. त्यावेळी सभापती म्हणून शिवसेनेच्या सभासद संगीत ठोसर यांनी कामकाज पाहिले. काही वेळाने ती सभाही तहकूब करण्यात आली. त्यानंतर पुढच्या सभेचे कामकाज सुनील कांबळे यांनी पहिले. त्यामुळे अशाप्रकारे एकाच दिवशी 4 सभापतींनी सभा चालवण्याचे प्रसंग क्वचितच घडले असतील.