एकाच रात्रीत 11 दुकाने फोडली

0

मुरबाड । मुरबाड पोलीस ठाण्यापासून अगदी अवघ्या 8 कि.मी. अंतरावर असलेल्या एका रात्रीत अज्ञात चोरट्यांनी 7 दुकाने फोडल्याने व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच शिवले गावात एक महिन्यापूर्वी शिवले महाराष्ट्र बँकमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून बँकेतील 13 एटीएम कार्ड घेऊन पोबारा केला होता. मात्र, सदर चोरटा हा बँकेतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून, बँक व पोलीस खात्याच्या निदर्शनास आले असले, तरी त्या चोरट्यास पाडण्यात पोलिसांना अजूनही यश मिळत नसल्याने शिवले गावातील नागरिक पोलीस खात्यावर नाराज आहेत.

शिवले येथील 7 दुकाने फोडून त्याच चोरट्यांनी त्याच रात्री मुरबाड शहरातील 4 दुकाने फोडली आहेत, अशी एकूण एकाच रात्री 11 दुकाने फोडल्याने पुन्हा एकदा चोरट्यांनी मुरबाड तालुक्यात धुमाकूळ घातला आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पोलीस कशाप्रकारे या चोरट्यांना पकडतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.