एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागातर्फ जिल्ह्यातील आदिवासी शाळा व वस्तीगृहांवर ९००० वृक्षांची लागवड : प्रकल्प अधिकारी अरूण पवार
यावल ( प्रतिनिधी ) येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागा च्या वतीने विविध उपक्रमांनी व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते परिसरात वृक्षरोपण करून व आदी कार्यक्रमांनी जागतिक आदिवासी दिन मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला . यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास कार्यालयाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन भव्य अशा स्वरूपात साजरा करण्यात आला ,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत कुमार हे होते तर प्रमुख मान्यवरांमध्ये रावेर यावल चे आमदार शिरीष चौधरी ,आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी सौ प्रतिभा चव्हाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे ,न्याय व विधी विभागाचे जिल्हा सचिव सैय्यद साहेब ,यावल न्यायालयाचे न्या.एस बी वाळके,वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख , पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे व पश्चीम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे, तहसीलदार मोहनमाला नाझिकर ,यावलच्या माजी नगराध्यक्ष सौ नौशाद तडवी, यावलचे गट शिक्षणधिकारी विश्वनाथ धनके, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील,उपसभापती बबलु कोळी तसेच आदीवासी चळवळीतील समाजसेवक एम बी तडवी, दिलरूबाब तडवी, मुनाफ तडवी ,मिना तडवी यांच्यासह मोठया प्रमाणावर आदिवासी बांधव यांची कार्यक्रमास मोठी उपस्थिती लाभली , कार्यक्रमाच्या सुरूवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आलीत व आदीवासी थोर क्रांतीकारी भगवान बिरसा मुंडा, खाजा नाईक व आदीच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली , या प्रसंगी आपल्या प्रस्ताविक मध्ये प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी ९ ऑगस्ट दिनाचे औचित्य साधुन प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय अनुदानीत आश्नम शाळा व आदिवासी मुला / मुलींचे शासकीय वस्तीगृह येथे विविध जातीचे ९००० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असल्याची माहीती प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांनी दिली . याप्रसंगी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार विविध प्रकारच्या वृक्षांची रोपे देवुन करण्यात आली , दरम्यान कार्यक्रमास्थळी आदिवासी बांधवांच्या वतीने लावण्यात आलेल्या जन धन वन धन या विविध प्रकारच्या वन औषधी संदर्भातील माहिती ठेवण्यात आलेल्या स्टॉलची त्यांनी पाहणी केली .