एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा

0

शहापूर । शहापूर येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्पस्तरीय अंतर्गत असणार्‍या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पेंढरघोळ येथे 15 ते 17 नोव्हेंबर ह्या तीन दिवसांच्या कालावधीत ह्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा स्पर्धेत पेंढरघोळ, शेणवा, अघई, टाकीपठार, सुसरवाडी, तळवळी, मोरोशी, दहागाव व सावरोली आदी शासकीय व अनुदानीत शाळेतील 1165 विद्यार्थी व 785 विद्यार्थीनी अशा एकूण 2146 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

विजेत्यांना केले सन्मानित
स्पर्धेत कबड्डी, खोखो, नृत्यासह वैयक्तिक व सांघिक खेळामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपले उत्तम प्रदर्शन केले. क्रीडा स्पर्धेत काही आदिवासी विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय खेळासारखे प्रदर्शन करून उत्कृष्ट कामगिरी करत उपस्थितांची मने जिंकली. ह्या प्रकल्प स्तरीय आयोजित तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेच्या बश्रिस वितरण संभारभास अप्पर आयुक्त चंद्रकांत डांगे, शहापूर प्रकल्प अधिकारी लोमेश सलामे, उप आयुक्त शेख, सी.एच.एम महाविद्यालयाचे प्राचार्य पवार ,पोलिस निरीक्षक महेश शेट्ये व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधाकर शिंदे सह आश्रमशाळेतील मुख्यध्यापक, अधीक्षक व प्रकल्पातील कर्मचारी वर्ग आदीसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.